News

सातबाऱ्यावर होणार ऑनलाइन नोंद

news-thumbnail

खरेदी विक्री नोंदीची लिंक थेट उपनिबंधक कार्यालयात सातबारा उताऱ्यावरील फेरफार नोंदीही अद्यावत करत त्यांची लिंक थेट उपनिबंधक कार्यालयास दिली जाणार आहे. ऑनलाइनच त्यावर खरेदी विक्रीचे व्यवहार व खरेदी विक्री करणाऱ्यांची नावे उताऱ्यावर नोंदविली जाणार असल्याने आता तलाठी मंडळ अधिकाऱ्याकडे जाण्याची आवश्यकता नसून त्यांचे उत्पन्नही कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रायोगिक तत्वावर देवळा तालुक्याची नोंद केली आहे. प्रथम तेथे हा उपक्रम राबवला जाईल. १५ जूनपर्यंत सर्व माहिती राज्य डेटा केंद्रास पाठवली जाणार आहे. त्यानंतर लागलीच ऑनलाइन सातबारा उतारा मिळेल. यात उपनिबंधकाच्या वेबसाईटला त्याची त्याची जोडणी असेल. त्यांना लागलीच खरेदी विक्री व्यवहार झाल्यानंतर नोंद अद्यावत करता येईल.