News

यंदा रेडी रेकनरचे दर वाढणार नसल्याची माहिती,

news-thumbnail

घर खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्यांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यंदा रेडी रेकनरचे दर वाढणार नसल्याची माहिती असून त्यामुळे घरांच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये घर घेण्याची अनेकांची इच्छा असते, मात्र घरांच्या वाढत्या किमती आणि गृहकर्जाचे व्याजदर यामुळे अनेकांसाठी स्वतःचं घर विकत घेणं ही डोकेदुखी ठरते. मात्र यावेळी रेडी रेकनरचे दर स्थिर राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पर्यायाने मुंबईसह महाराष्ट्रात घराच्या किंमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. घरांच्या वाढत्या किंमतींमुळे तयार घरं विकली जात नाहीत, त्यामुळे बिल्डर लॉबीकडून सातत्याने रेडी रेकनरचे भाव स्थिर राखण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे घरांचे दर स्थिर राहिल्यास बिल्डर आणि गृहखरेदी इच्छुकांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.