News

शेती झोनमध्ये होणार तारांकित हॉटेल्स...

news-thumbnail

नाशिक पुण्यासह राज्यांतील चौदा मंजूर प्रादेशिक योजनांमधील 'शेती ना विकास' झोनवर थ्री स्टार व त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाच्या तारांकित हॉटेलच्या उभारणीला राज्यसरकारने मंजुरी दिली आहे. महामार्गाच्या शेती तसेच शेती न विकास झोनवर बांधकामासाठी फक्त ०.१० चटई क्षेत्र मंजूर आहे या झोनवर आता ०. ९० चटई क्षेत्र जादा मंजूर केले जाणार आहे. नाशिक जळगाव - भुसावळ प्रदेशसह पुणे,कोल्हापूर-इचलकरंजी ,सांगली-मिरज,नागपूर ,चंद्रपूर -बल्लाळपूर, नगर, औरंगाबाद प्रदेश रत्नागिरी,रायगड, सिंधूदुर्ग अमरावती व मुंबई महानगर प्रदेशातील मंजूर प्रादेशिक योजनातील शेती व शेती ना विकास झोनवर अशी हॉटेल्स होतील.