News

टीडीआर वाढीने गृह स्वस्ताई शक्य

news-thumbnail

साधुग्रामसाठी १६३ एकर भूसंपादनाच्या बदल्यात ६०० एकर टीडीआर बाजारात उपलब्ध होण्याची अशा निर्माण झाली असून, तसे झाल्यास मर्यादित लोकांकडे असलेली टीडीआर ची कृत्रिम टंचाई दूर होण्यासह टीडीआरचे दर कमी होऊन बांधकाम व्यावसायिकांचा फायदा होण्याची चिन्हे आहेत. पर्यायाने ग्राहकांनाही स्वस्तात घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. साधुग्रामसाठी एकास तीन याप्रमाणे टीडीआर देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे बाजारात मोठया प्रमाणात टीडीआर निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात टीडीआर निर्माण होण्याची शक्यता आहे. मुळात सध्या टीडीआर चे दर जवळपास सहा ते सात पटीने वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांपुढे जमिनीइतकीच टीडीआर ची किंमत असा पेच निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून घरेही महाग होत आहेत. आधीच बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण असताना त्यात महागडया घरांमुळे ग्राहकांची अडचण होत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात टीडीआर असल्यास बांधकाम व्यावसायिकांसमोर पर्याय निर्माण होईल. दारावर नियंत्रण येऊन त्यामुळे घरांच्या किमतीही कमी होण्याची चिन्हे आहेत.