News

एन. ए. धारकांना आता द्यावी लागणार तीस दिवसांत माहिती

news-thumbnail

मुदतीनंतर भरावा लागणार अकृषक आकारणीसह दंड बिनशेती (एन. ए) परवान्यांच्या नवीन नियमानुसार एन. ए. धारकांने जमीन वापराचे रूपांतरण केल्याच्या दिवसापासून ३० दिवसाच्या आत त्याची माहिती ग्रामअधिकारी किंवा तहशीलदारांना लेखी स्वरुपात देणे बंधनकारक केले आहे. संबंधित व्यक्तीने वेळेत माहिती न दिल्यास अकृषक आकारणी देण्याबरोबरच अधिक २५ हजार रुपये किंवा अकृषक आकारणीच्या चाळीसपट यापैकी जी रक्कम अधिक असेल ती दंडापोटी भरावी लागणार आहे. त्यामुळे आता एन. ए. ची परवानगी घेऊन वर्षानुवर्षे त्या जमिनीचा घेतलेल्या कारणासाठी वापर न करणाऱ्यांना आळा बसणार आहे.