News

आता फ्लॅट्सचीही ऑनलाइन शॉपिंग

news-thumbnail

देशात ऑनलाइन शॉपिंग सध्या जोरात सुरु आहे. आता घरांचीही ऑनलाइन विक्री सुरु झाली आहे. इंटरनेटचे जाळे व्यापक झाल्याने बिल्डर्सनाही घर विक्रीसाठी ऑनलाइन पर्यायाची क्षमता लक्षात आली असून, काही बिल्डर्सना त्यात चांगले यश मिळाले आहे. मुंबईतील एक विकासक लोढा समूहाने नवी मुंबईच्या नजीक पलावा येथील टाऊनशीपसाठी ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून १०० हून जास्त बुकिंग मिळवले आहेत. लोढा समूहाचे प्रवक्ता म्हणाले, ऑनलाइन झाल्याने समूहाला ग्राहकांसोबत थेट नाते जोडण्यास चांगली मदत झाली. यामुळे ग्राहकांना मुलभूत माहितीसह बुकिंग आणि विक्रीसाठी मदत आहे. या वर्ष्याच्या प्रारंभी टाटा उद्योग समूहाचे टाटा व्हल्यु होम्स या सहयोगी कंपनीने चार दिवसांच्या ऑनलाइन मोहिमेत आपल्या प्रकल्पातील २०० हून जास्त फ्लॅट्सची विक्री केली होती. यापूर्वी गुगल ऑनलाइन शॉपिंग कार्निव्हलमध्ये त्यांनी ५० घरांची विक्री केली होती.