News

रिअल इस्टेट व्यवहारांवर मोठा प्रभाव

news-thumbnail

ऑनलाइन सर्च: ४३ अब्ज डॉलरची उलाढाल भारतात रिअल इस्टेट क्षेत्रातील तब्बल ४३ अब्ज डॉलरच्या व्यवहारांवर इंटरनेटचा मोठा प्रभाव असल्याचे नुकत्याच एका अभ्यासात उघड झाले आहे. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी लोक इंटरनेटवरून माहिती घेतात आणि त्यानंतर खरेदीचा व्यवहार निश्चितपने करतात, असे सर्वेक्षण सांगते. स्थावर मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी इंटरनेटवरून त्याची माहिती घेणाऱ्यांच्या संखेत देशात सातत्त्याने वाढ होत आहे. साधारणपणे रिअल इस्टेट क्षेत्राची माहिती घेणाऱ्यांमध्ये मधील ५५ टक्के लोक इंटरनेटवरील माहितीवर संबंधित मालमत्तेचा दर्जा आणि किंमत ठरवितात. त्यानंतर ते संबंधित फ्लट किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे निश्चित करतात. असे Google India च्या एका सर्वेक्षणात आढळले आहे. विविध वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून मालमत्ता खरेदीचे ५५ टक्के निर्णय घेतले जातात. विशेष म्हणजे त्यातून होणारी उलाढाल थोडीथोडकी नव्हे, तर ४३ अब्ज डॉलर एवढी असल्याचा निष्कर्ष या अभ्यासक्रमात काढण्यात आलेला आहे. ७७ टक्के ऑनलाइन सर्च घर खरेदीसाठी करण्यात येतात. तर इंटरनेटवरील २६ टक्के सर्च भाड्याने घर घेण्यासाठी करण्यात येत असल्याचे सर्वेक्षणात आढळले.