News

अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

news-thumbnail

पंचवटी विभागातील नांदूर व दसक भागात गुंठेवारीमध्ये महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधण्यात आलेल्या पाच घरांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तात कारवाई करीत ही अनधिकृत घरे उध्वस्त केली. नादुर दसक शिवारातील सर्व्हे नंबर ३४ मध्ये काही जणांनी गुंठेवारीने क्षेत्र साठेखत करून घेत एन. ए. ची परवानगी नसतांना आणि महापालिकेची परवानगी न घेत पक्की घरे बांधलेली आहेत. गुंठेवारीला महापालिका कोणतीही परवानगी देत नसताना पक्की घरे बांधण्यात आल्याच्या तक्रारी नुसार आज महापालिकेने पोलिस बंदोबस्तात या ठिकाणी बांधण्यात आलेली पाच घरे तोडली.