News

विकासासाठी जमीन दिल्यास मुद्रांक शुल्कात सवलत

उच्च न्यायालयाचे निर्देश : एखाद्या व्यक्तीने फ्लट स्कीमसाठी आपली जमीन बिल्डरला दिली तर त्याच जागेवर त्या व्यक्तीला जे फ्लट मिळतील त्यावर तिला प्रचलित दराने मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. मूळ जमीन मालक आणि बिल्डर यांच्यात जेव्हा जमिन विकासासाठी करार होतो तेव्हा बिल्डर ने ५.५० टक्के मुद्रांक शुल्क भरलेले असते. त्यामुळे त्याच जागेवर विकसित झालेल्या घरांपैकी जी घरे मूळ जमीन मालकाला दिली जातील त्यावर मुद्रांक शुल्क इतरांप्रमाणे लावू नये, असा युक्तिवाद याचिका कर्त्याने केला होता आणि उच्च न्यायालयाने तो मान्य केला होता. केवळ महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम ४ नुसार मुद्रांक शुल्क अकारावे, असे महसूल विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या कलमातील तरतुदीनुसार केवळ २० रुपयांच्या मुद्रांकावर व्यवहार होतील.

View More »
 < 1 2 3